• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, November 16, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

दुष्काळी मदतीसाठी फार्मर आयडी तातडीने काढा!

Terna Vruttant by Terna Vruttant
November 16, 2026
in मुख्य बातम्या, कृषी, महाराष्ट्र
0
दुष्काळी मदतीसाठी फार्मर आयडी तातडीने काढा!
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


ई-केवायसी पूर्ण करण्याचे मदत व पूनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषीविषयक तसेच अन्य विभागांच्या योजनांचा लाभ थेट मिळावा, यासाठी ॲग्रीस्टॅक प्रणालीतील माहिती अद्ययावत असणे आवश्यक आहे. या प्रणालीच्या माध्यमातून कृषी व अन्य विभागांच्या विविध योजनांची मदत शेतकऱ्यांपर्यंत सातत्याने पोहोचविण्यात येत आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून फार्मर आयडी प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related posts

हरवलेले पाकीट प्रामाणिकपणे परत करून कर्मचाऱ्याने जपली माणुसकी

हरवलेले पाकीट प्रामाणिकपणे परत करून कर्मचाऱ्याने जपली माणुसकी

November 16, 2026
नगराध्यक्ष धरणे यांच्या हस्ते भास्करराव पेरे पाटील यांचा सत्कार

नगराध्यक्ष धरणे यांच्या हस्ते भास्करराव पेरे पाटील यांचा सत्कार

November 16, 2026

शासनाच्या विविध योजनांमधून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य, अनुदान व अन्य लाभ देण्यात येतात. यापूर्वीही शासनाने विविध संकटांच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. सध्या राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रीम मदत देण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ई-केवायसी व फार्मर आयडीचे महत्त्व अधिक वाढले आहे. पात्र शेतकऱ्यांना मदतीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक नोंदणी व पडताळणी प्रक्रिया पूर्ण असणे गरजेचे आहे.

ॲग्रीस्टॅक प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची माहिती एकत्रित व अद्ययावत करण्यात येत असून, विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरत आहे. शेतकऱ्यांनी ई-केवायसी तसेच फार्मर आयडीची प्रक्रिया पूर्ण केल्यास योजनांचा लाभ मिळण्यातील अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे.

ई-केवायसी किंवा फार्मर आयडी तयार करताना शेतकऱ्यांना काही तांत्रिक अथवा अन्य अडचणी येत असल्यास राज्य शासनामार्फत त्या सोडविण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल. शेतकऱ्यांनी कोणत्याही अडचणीमुळे प्रक्रिया अपूर्ण ठेवू नये. संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून आपली माहिती अद्ययावत करावी व आवश्यक पडताळणी पूर्ण करावी.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचावा, यासाठी ई-केवायसी व फार्मर आयडी पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार करण्यासाठी जवळच्या सीएससी (नागरी सुविधा केंद्र) येथे आधार कार्ड व आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकासह जाऊन फार्मर आयडी तयार करून घ्यावा. राज्यातील शेतकऱ्यांनी या प्रक्रियेला प्राधान्य देऊन तातडीने पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन मदत व पुनर्वसन विभागाने केले आहे.

Previous Post

नगराध्यक्ष धरणे यांच्या हस्ते भास्करराव पेरे पाटील यांचा सत्कार

Next Post

हरवलेले पाकीट प्रामाणिकपणे परत करून कर्मचाऱ्याने जपली माणुसकी

Next Post
हरवलेले पाकीट प्रामाणिकपणे परत करून कर्मचाऱ्याने जपली माणुसकी

हरवलेले पाकीट प्रामाणिकपणे परत करून कर्मचाऱ्याने जपली माणुसकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

तुळजापुरात २० कोटींचा ‘उमेद मॉल’

तुळजापुरात २० कोटींचा ‘उमेद मॉल’

3 weeks ago
Maharashtra Cabinet Meeting Decision 7th october

मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय! कर्करोग उपचारांसह झाले ‘हे’ 5 महत्वाचे निर्णय

1 year ago
Tirupati Balaji Temple Using AI Technology

तिरुपतिमध्ये गर्दी नियंत्रणासाठी लवकरच AI तंत्रज्ञानाची एंट्री भारतातील पहिलाच प्रयोग

1 year ago
दुष्काळाच्या संकटात जिल्हा प्रशासन खंबीरपणे पाठीशी : जिल्हाधिकारी 

दुष्काळाच्या संकटात जिल्हा प्रशासन खंबीरपणे पाठीशी : जिल्हाधिकारी 

3 weeks ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • हरवलेले पाकीट प्रामाणिकपणे परत करून कर्मचाऱ्याने जपली माणुसकी
  • दुष्काळी मदतीसाठी फार्मर आयडी तातडीने काढा!
  • नगराध्यक्ष धरणे यांच्या हस्ते भास्करराव पेरे पाटील यांचा सत्कार

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

हरवलेले पाकीट प्रामाणिकपणे परत करून कर्मचाऱ्याने जपली माणुसकी

हरवलेले पाकीट प्रामाणिकपणे परत करून कर्मचाऱ्याने जपली माणुसकी

November 16, 2026
दुष्काळी मदतीसाठी फार्मर आयडी तातडीने काढा!

दुष्काळी मदतीसाठी फार्मर आयडी तातडीने काढा!

November 16, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.