• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, November 11, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

दुष्काळाच्या छायेतही माणुसकीचा दिवा 

Terna Vruttant by Terna Vruttant
November 11, 2026
in मुख्य बातम्या, धाराशिव
0
दुष्काळाच्या छायेतही माणुसकीचा दिवा 
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शेतकरी अन् आदिवासी बांधवांसोबत आ. राणादादांची दिवाळी!

चोराखळी, बारूळ येथे फराळासोबत घोंगडी बैठकीत शेतकऱ्यांशी संवाद

Related posts

दुष्काळी परिस्थितीत गायरान व वैयक्तिक जमिनीवर अतिरिक्त चारा पिकांच्या लागवडीला मान्यता : मंत्री गोगावले

दुष्काळी परिस्थितीत गायरान व वैयक्तिक जमिनीवर अतिरिक्त चारा पिकांच्या लागवडीला मान्यता : मंत्री गोगावले

November 9, 2026
एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय १ जानेवारी २०२७ पर्यंत पुढे ढकलला : मंत्री प्रताप सरनाईक

एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय १ जानेवारी २०२७ पर्यंत पुढे ढकलला : मंत्री प्रताप सरनाईक

November 9, 2026

धाराशिव : जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना शेतकरी बांधवांना धीर देण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी चोराखळी व बारुळ येथे दिवाळी फराळासोबत घोंगडी बैठक घेतली. तसेच सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील येडशीजवळ आदिवासी बांधवांच्या पालावर जाऊन त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा केला.

घोंगडी बैठकीत शेतकरी, युवक, वडीलधारी मंडळी आणि तरुणांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. दिवाळी फराळाचा आस्वाद घेताना शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी, अपेक्षा आणि प्रश्न मांडले. हा संवाद केवळ सणापुरता मर्यादित नसून संकटाच्या काळात शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा विश्वास देणारा असल्याचे पाटील यांनी सांगितले. दुष्काळावर मात करण्यासाठी आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जिल्ह्यात अनेक ठोस प्रयत्न सुरू आहेत. उजनीतून धाराशिवसाठी एक टीएमसी पाणी उपलब्ध होत आहे. गावागावांत नोडल अधिकारी नियुक्त केले असून चारा लागवड आणि गाळपेर क्षेत्रातील शेतीला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या संकटात शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये. त्यांच्या सुख-दुःखात आणि संघर्षात आपण खंबीरपणे सोबत आहोत, अशी ग्वाहीही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी दिली.

दरम्यान, येडशीजवळील आदिवासी बांधवांच्या पालावर भेट देऊन आमदार पाटील यांनी चिमुकल्या मुलांसह कष्टकरी कुटुंबीयांबरोबर दिवाळी फराळाचा आनंद घेतला. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि आपुलकीतून दिवाळीचा खरा आनंद अनुभवायला मिळाला, असे त्यांनी सांगितले. दिवाळीचा खरा आनंद केवळ रोषणाईत नसून माणसांच्या चेहऱ्यावरील समाधानात आणि परस्परांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यात आहे, अशी भावना व्यक्त करत या जिल्ह्यातील सर्व सहकारी बांधवांनी अशाच उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

यावेळी चोराखळी येथे विकास बारकुल, गणेश बारकुल, खंडेराव मैदाड, पोपट जेवे, शिवाजी बाराते, रामकिसन कोकाटे, मदन बारकुल, स्वप्निल दिवाने, रणजित दिवाने विश्वंभर मैंदाड, बाबू भाई उपस्थित होते.

बारुळ येथे सिध्देश्वर कोरे, विक्रम देशमुख, संतोष बोबडे, दयानंद शिंदे, वैभव मरडे, किसन देडे, भिवाजी इंगोले, प्रभाकर मुळे, अनिल बंडगर, प्रशांत लोमटे, बाबुराव ठोंबरे, शहाजी सुपनार, नबीलाल शेख, संजय ठोंबरे, सुधीर सुपनर, पंकज धनवडे, भास्कर सगट, रतन मुदगुडे, बाबुराव यावलकर, बाबुराव टोम्पे, अशोक देवगुंडे, पद्मराज गडदे, दामाजी राठोड, कल्याण बिराजदार उपस्थित होते

येडशी येथे संजय लोखंडे, विजय सस्ते, डॉ.प्रशांत पवार, शशांक सस्ते, जयंत भोसले, सुनील शेळके उपस्थित होते.

Previous Post

दुष्काळी परिस्थितीत गायरान व वैयक्तिक जमिनीवर अतिरिक्त चारा पिकांच्या लागवडीला मान्यता : मंत्री गोगावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

‘म्हणून मी काँग्रेस सोडून भाजपात आलो’, अशोक चव्हाणांनी अखेर सांगितलं कारण

‘म्हणून मी काँग्रेस सोडून भाजपात आलो’, अशोक चव्हाणांनी अखेर सांगितलं कारण

1 year ago
OBC Reservation

ओबीसींसाठी आता मंत्रिमंडळ उपसमिती गठीत होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

1 year ago
तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित, मंत्रीमंडळाचा निर्णय

तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित, मंत्रीमंडळाचा निर्णय

6 months ago
ONGC Uran Plant Fire

उरणमधील ONGC प्रकल्पाला भीषण आग, आगीचे लोळ पाहून लोकांमध्ये घबराट

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • दुष्काळाच्या छायेतही माणुसकीचा दिवा 
  • दुष्काळी परिस्थितीत गायरान व वैयक्तिक जमिनीवर अतिरिक्त चारा पिकांच्या लागवडीला मान्यता : मंत्री गोगावले
  • एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय १ जानेवारी २०२७ पर्यंत पुढे ढकलला : मंत्री प्रताप सरनाईक

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

दुष्काळी परिस्थितीत गायरान व वैयक्तिक जमिनीवर अतिरिक्त चारा पिकांच्या लागवडीला मान्यता : मंत्री गोगावले

दुष्काळी परिस्थितीत गायरान व वैयक्तिक जमिनीवर अतिरिक्त चारा पिकांच्या लागवडीला मान्यता : मंत्री गोगावले

November 9, 2026
एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय १ जानेवारी २०२७ पर्यंत पुढे ढकलला : मंत्री प्रताप सरनाईक

एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय १ जानेवारी २०२७ पर्यंत पुढे ढकलला : मंत्री प्रताप सरनाईक

November 9, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.