• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, June 12, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home Uncategorized

मंत्रिमंडळ बैठकीत आपल्या सगळ्या मागण्यांना हिरवा कंदील – आमदार राणाजगजितसिंह पाटील

Terna Vruttant by Terna Vruttant
September 30, 2025
in Uncategorized, BREAKING NEWS, धाराशिव, महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
Cabinet OKs all demands:MLA Ranajagjitsinh Patil
70
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सार्वत्रिक जनभावना लक्षात घेत दुष्काळी उपाययोजना तातडीने अंमलात आणण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेतीचे अभुतपुर्व नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी अक्षरशः जमीन खरवडून गेली आहे, विहिरी गाळाने भरल्या आहेत. त्यासाठी मोठी भरपाई आवश्यक आहे. शेतकरी बांधवांकडून बँकांनी कर्जवसुली करू नये, निकषात न बसणाऱ्या बाबींसाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे केली होती. भरीव नुकसान भरपाईच्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांनी दिलासा दिला आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलेल्या सगळ्याच मागण्यांना हिरवा कंदील मिळाला आहे.(Cabinet OKs all demands:MLA Ranajagjitsinh Patil)

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयांची राज्यभरातील शेतकरी बांधवांना सविस्तर माहिती दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांना मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या अत्यंत महत्वाच्या घोषणेसह शेतकरी हिताच्या अनुषंगाने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सातत्याने केलेल्या सर्व मागण्यांना देखील मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. आमदार पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यानिमित्ताने यश मिळाले आहे.

Related posts

CM Devendra Fadnavis Helps Latur Farmer

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

June 11, 2026
Tuljabhavani Temple

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

June 9, 2026

धाराशिव जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात अभूतपूर्व अतिवृष्टी झाली. पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. अनेक ठिकाणी शेतजमीन खरवडून गेली, विहिरीत गाळ साचला. यातील अनेक बाबी एनडीआरएफच्या निकषात बसत नसल्या तरी सणासुदीच्या दिवसांत आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी तातडीने विशेष उपाययोजना राबवून दिवाळीपूर्वी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ‘मित्र’चे उपाध्यक्ष, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

कर्ज वसुलीसाठी बँका शेतकऱ्यांकडे सतत तगादा लावत असल्याच्या अनेक तक्रारी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार आमदार पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सर्व बँकांना वसुलीची सक्ती न करण्याचे निर्देश दिले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज यावरही शिक्कामोर्तब केले आहे. जमीन खरवडून गेली, विहिरींत गाळ गेला असेल तर नुकसानभरपाई द्यावी, शेतकऱ्यांकडील कर्जवसुलीला स्थगिती द्यावी आदी आमदार राणाजगजतिसिंह पाटील यांनी केलेल्या तिन्ही शेतकरी हिताच्या मागण्या मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केल्या आहेत.

‘ओला दुष्काळ’ हा शब्द तांत्रिकदृष्ट्या महसूल नियमावलीत (म्हणजेच Maharashtra Land Revenue Code किंवा Manual of Drought Relief) नसला तरी जनतेची सार्वत्रिक भावना ही जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा अशी आहे. असे जिल्ह्यातील जनतेच्या वतीने आमदार राणाजजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्‍यांना तसे कळविले होते. त्युसार दुष्काळाच्या काळात ज्या उपाययोजना करण्यात येतात त्या सर्व लागू करण्याचा निर्णयही मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे बाधित नागरिकांना विविध सवलती मिळणार आहेत. शेतकऱ्यांच्या थेट खात्यात मदत येण्यासाठी ईकेवायसीची अटही शिथिल करण्यात आली आहे. अॅग्रीस्टॅकनुसार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये मदतीचा निधी जमा केला जाणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

आमदार पाटील बनले शेतकऱ्यांचा आवाज

शेती, पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे निकष न लावता सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी, यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औसा तालुक्यातील उजनी येथे आले असता आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची घोषणा त्यांनी केली होती. मंगळवारी पुन्हा एकदा लिखित स्वरूपात करण्यात आलेल्या सर्व मागण्यांना हिरवा कंदील मिळाला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलेल्या सकारात्मक पाठपुराव्याचे हे यश आहे.

टंचाई जाहीर, अशा सवलती मिळणार

१) जमीन महसुलात सूट

२) सहकारी कर्जाचे पुनर्गठन.

३) शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती.

४) कृषी पंपांच्या चालू विजबिलात ३३.५% सूट.

५) शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे परीक्षा शुल्क माफ.

६) रोहयो अंतर्गत कामाच्या निकषांत काही प्रमाणात शिथिलता.

८) टंचाई जाहीर केलेल्या गावांत शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपांची वीजजोडणी खंडीत न करणे.

Previous Post

विज्ञान-तंत्रज्ञानाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘नासा’ला भेट देण्याची मोठी संधी

Next Post

महाराष्ट्रातील इंधनाचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोलची किंमत किती? 

Next Post
Petrol Diesel Price in Marathi

महाराष्ट्रातील इंधनाचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोलची किंमत किती? 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

MLA Ranajagjitsinha Patil on Crop Cutting Experiment

पिकविम्यातून मोठी आर्थिक मदत मिळणार; पीककापणी प्रयोगाबाबत सतर्क राहा- आ. पाटील यांचे आवाहन

9 months ago
shri tuljabhavani temple shikhar

तुळजाभवानी मंदिराचे शिखर पाडण्याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका- जिल्हाधिकारी किर्तीकिरण पूजार

10 months ago
Ramdara to Ekuraka

कृष्णा मराठवाडा,रामदारा ते एकुरका कामास मंजुरी; ७ हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली- आमदार राणाजगजितसिंह पाटील

9 months ago
75 thousand new houses in dharashiv

पंतप्रधान आवास योजनेत जिल्ह्यात ७५ हजार नवीन घरकुल – आ. राणाजगजितसिंह पाटील

11 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 
  • Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
  • Monsoon Maharashtra : राज्यात १५ जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

CM Devendra Fadnavis Helps Latur Farmer

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

June 11, 2026
Tuljabhavani Temple

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

June 9, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.