अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत बँकांनी शेतकऱ्यांकडून कर्जवसुली करू नये, शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवरील होल्ड तातडीने हटवावेत, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानातून, मदतीतून वसुली करू नये, अशा सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी बँकांना दिल्या होत्या.(MLA Ranajagjitsinha Patil)
आमदार पाटील यांनी दिलेल्या आदेशानंतर एसबीआय बँकेने पत्र काढत नैर्सार्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्य वसुलीसाठी वळती करू नये असे पत्रक काढले आहे. एसबीआय बंकेंचे धाराशिव मुख्य प्रबंधक यांनी हे आदेश सर्व जिल्हा समन्वयक, बँक शाखा अधिकारी यांना पत्र लिहून यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी बँकांना दिलेल्या आदेशामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारच्या वतीने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. हि या मदतीचा शेतकऱ्यांना फायदा होणे गरजेचे आहे. आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात सापडला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत आहेत, त्यांना धीर देत आहेत. त्यांच्याशी संवाद साधत आहे. यातूनच शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेत त्यांनी बँकांना शेतकऱ्यांना मिळणारा मदत निधी कर्ज म्हणून वळते करून घेऊ नये अशा शकत सूचना दिल्या होत्या. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मिळणारी मदत पुन्हा नव्याने उभा राहण्यासाठी होणार असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.








