मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते धरशिवच्या शिवाजी चौक येथे स्वराज्य ध्वज स्तंभाचे भूमिपुजन करण्यात आले. हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी धाराशिवकरांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना श्रदधांजली वाहीली.(Manoj Jarange dharashiv)
यावेळी मंचावर धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची १५९ फुट उंचीची भगवी पताका धाराशिवच्या शिवाजी चौकात उभारण्यात येणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते या भव्य ध्वजाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मराठा सेवक,धाराशिव येथील नागरिक यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थितीत होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.








