गेल्या काही दिवसांमध्ये भूम तालुक्यात पावसाने कहर केला होता. या पावसामध्ये शेतीची व शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे प्रशासनाकडून पंचनामे ही सुरू झाले आहेत. यादरम्यान जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी गुरुवारी (दि.२१) भूम तालुक्यातील नुकसानीची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदचे सीईओ मैनाक घोष, प्रभारी जिल्हा कृषी अधिकारी महादेव आसलकर, भुमचे तहसीलदार जयवंत पाटील, तालुका कृषी अधिकारी अतुल ढवळे त्यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.(Collector inspects damage in Bhum)