धाराशिव जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी, सततचा व ढगफुटीसदृश पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे परिणामी शेतकऱ्यांनी काळजी करू नये असे आव्हान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी असे निर्देश आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे. (Farmers will get assistance- MLA Patil)
माणकेश्वर मंडळातील ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतींचे तत्काळ पंचनामे
माणकेश्वर मंडळातील ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतींचे पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. बांधावर जाऊन प्रत्यक्ष पंचनामे करावे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा अधिक झाले असतील त्यांना नुकसान भरपाई तत्काळ पोहोचवण्याची कारवाई जलद गतीने करण्यात यावी अशा सूचनाही यावेळी आमदार पाटील यांनी दिल्या.
शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी काळजी करू नये. त्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात शासनस्तरावर नियोजन झाले आहे असे आवाहन यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केले.