तुळजाभवानी देवी मंदिराच्या मुख्य शिखराबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. मात्र लवकरच पुरातत्व विभागाच्या बैठकीत सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. देवीचे शिखर पाडण्याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पूजार यांनी भाविकांना केले आहे. (shri tuljabhavani temple shikhar)
तुळजाभवानी देवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या सुरु असून मंदिराचे शिखर पाडण्याबाबत पसरलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किर्तीकीरण पूजार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, तुळजाभवानी देवी मंदिराच्या मुख्य शिखराबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. मात्र लवकरच पुरातत्व विभागाच्या बैठकीत याबाबत निर्णयाची अपेक्षा आहे. दरम्यान केंद्रीय पुरातत्व विभागाकडून देण्यात आलेल्या अहवाला नंतर मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेऊन तोडगा कढण्यात येईल असे जिल्हाधिकारी म्हणाले. समाजात पसरलेल्या अफवा या खोट्या असून शिखर अद्याप पाडलेले नसून केवळ जीर्णोद्धार सुरु असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदे म्हटले आहे.