तुळजापूर शहर आणि परिसरातून ड्रग्ज हद्दपार झाला आहे. तुळजापूरात ज्या पद्धतीने काही नागरिकांचे सहकार्य घेऊन हे विष उखडून टाकण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या मदतीने मोहीम राबविली अगदी तशीच व्यापक मोहीम जागतिक युवा दिनाच्या निमित्ताने जिल्हाभरात युवकांच्या सहकाऱ्यांने राबविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. पोलिस आणि जिल्हा प्रशासनाला तशा सूचनाही दिल्या आहेत. जिल्ह्यातील युवकांना सजग होऊन ड्रग्जविरोधी मोहिमेत प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.(Anti-drug campaign to be implemented across the district)
जागतिक युवा दिनी जगभर युवकांना उध्वस्त करणाऱ्या या विषारी धंद्या विरुद्ध लढा देण्याची जबाबदारी आम नागरिकांनी देखील स्वीकारायला हवी. तुळजापूर शहर आणि परिसरात सुरू असलेला हा प्रकार मुळातून उखडून टाकण्यासाठी आपण नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले होते. मिळालेल्या माहिती पोलीस प्रशासनाला देऊन सूचना दिल्या होत्या. पोलिसांनी संबंधित नागरिकांसह त्यांची यंत्रणा कामाला लावून मोठी कारवाई केली आणि आता तुळजापुरातून हा सगळा धंदा हद्दपार झाला आहे. नागरिकांनी दिलेल्या माहितीमुळे हे सगळे घडून आले. आता जिल्ह्यातील अन्य ठिकाणी सुरू असलेल्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत.