वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मानवी शरीराचे खूप महत्त्व असते. या मानवी शरीराद्वारे विद्यार्थी त्यावर शिक्षण घेत असतात आणि त्यानंतरच प्रत्यक्ष रुग्णांवर इलाज करण्याचं काम हे विद्यार्थी करत असतात. देहदान कमी झाल्याने आता मानवी देह हे विद्यार्थ्यांना अभ्यासण्यासाठी कमी प्रमाणात भेटत आहेत. म्हणूनच धाराशिव येथील आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठी Skill Lab उभारण्यात आली आहे.
रुग्णांच्या आजाराची फिलिंग असलेल्या सिलिकॉन बॉडीवर प्रॅक्टिकल करता येणार
वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाकडून उभारण्यात आलेल्या या लॅबमध्ये Virtual Technique आणि AI चा वापर करण्यात आला आहे. आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रुग्णांच्या आजाराची फिलिंग असलेल्या सिलिकॉन बॉडीवर आता प्रॅक्टिकल करता येणार आहे. मानवाच्या प्रत्येक जनरेशनच्या सिलिकॉन बॉडीचं या लॅबमध्ये इन्स्टॉलेशन करण्यात आलं आहे. AI चा वापर करून माणसाला होणाऱ्या प्रत्येक आजाराची तपासणी या लॅबमध्ये करता येणार आहे. या लॅबमध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या वयोगटातील लहान बाळ, वृद्ध माणसे, महिला अशी वेगवेगळी मॉलिक्युलं आणि सेक्शन तयार करण्यात आले आहेत. या सुविधेमुळे भविष्यात डॉक्टर रुग्णांना चांगली सेवा देऊ शकणार आहेत.