नवोदय विद्यालय समिती विभाग, पुणे यांच्यामार्फत विभाग स्तरीय अॅथलेटिक्स व सांघिक खेळांच्या स्पर्धेचे आयोजन जवाहर नवोदय विद्यालय बडोदा व जवाहर नवोदय विद्यालय राजकोट गुजरात येथे करण्यात आले होते. यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथील खेळाडूंनी वेगवेगळ्या गटांमध्ये अनेक खेळामध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धा वेगवेगळ्या गटांमध्ये मुली व मुले यांच्यामध्ये होत्या. या पुणे रिजनमध्ये महाराष्ट्र गुजरात, गोवा, दिव, दमण येथील खेळाडूंचा समावेश होता. या नॅशनल लेवल स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी अनेक खेळाडूंची निवड झाली आहे.(Navodaya Vidyalaya players for national competition)
राष्ट्रीय स्पर्धे साठी खालील विद्यार्थ्यांची निवड
या स्पर्धा आगामी काळात उत्तर प्रदेश मधील लखनऊ व गुजरात मधील राजकोट येथे होणार आहेत. या राष्ट्रीय स्पर्धे साठी कुमारी शुभांगी कोळी भालाफेक व नारायण उपासे लांब उडी अथलेटिक्स साठी तर सार्थक घुगे व शुभम हजारे यांची सांघिक खेळ हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य के वाय इंगळे व उप प्राचार्य डी व्ही बडे यांनी अभिनंदन करून या सर्व खेळाडूंचा सत्कार केला. तसेच या विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे चेअरमन, धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी अभिनंदन करून खेळाडूंना पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विद्यालयाचे वरिष्ठ अध्यापक एस डी खोब्रागडे, सांस्कृतिक कार्यक्रम प्रभारी हरी जाधव, श्रीमती एस आर कराड, विद्यार्थी, शिक्षक वृंद उपस्थित होते. या विद्याथ्यर्थ्यांचे पालक, शिक्षक संघाचे सर्व सदस्य यांनीही कौतुक करून अभिनंदन केले. या खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा अध्यापक सनी जाधव व क्रीडाध्यापिका प्रियंका लवटे यांनी विशेष मार्गदर्शन लाभले.