कारगिल विजय दिनानिमित्त युद्धजन्य परिस्थितीत घरात घुसून शत्रूला उध्वस्त करण्यासाठी सक्षम असलेल्या दोन खतरनाक बटालियनची भारतीय सैन्यादालाने घोषणा केली आहे. भारतीय सैन्यामध्ये रुद्र नावाची एक ब्रिगेड स्थापन केली आहे. यासोबतच, भैरव बटालियन देखील तयार करण्यात आली आहे. लडाख येथील द्रास येथे कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी याबाबत माहिती दिली. (Rudra and bhairav briged)
कशी आहे रुद्र ब्रिगेड?
रुद्र ही एक सर्वसमावेशक सशस्त्र ब्रिगेड असणार आहे. आत्तापर्यंत लष्कराकडे वेगवेगळ्या शस्त्रांवर आधारित स्वतंत्र ब्रिगेड असायच्या. मात्र, रुद्र ब्रिगेड मध्ये विविध प्रकारच्या आधुनिक शस्त्रसज्ज घटकांचा संगम असेल.जनरल द्विवेदी यांच्या मते, या ब्रिगेडमध्ये पायदळ, बख्तरबंद वाहनांमधील सैनिक, तोफखाना, विशेष प्रशिक्षण घेतलेले सैनिक आणि ड्रोनसारख्या मानवविरहित हवाई प्रणालींचा समावेश असेल.ही ब्रिगेड खास तयार केलेल्या रसद व सैन्य पाठबळासह सज्ज असेल, ज्यामुळे तिची ताकद आणखी वाढणार आहे.
भैरव ब्रिगेड म्हणजे काय?
भैरव ब्रिगेड ही एक उच्च प्रशिक्षित घातक ब्रिगेड असेल, जी स्पेशल फोर्सचे कार्य करेल. ही ब्रिगेड विशेषतः डोंगराळ व जंगल परिसरात सहजतेने ऑपरेशन पूर्ण करण्यासाठी, हलक्या पण अत्याधुनिक आणि अत्यंत घातक शस्त्रांनी सज्ज असेल. भैरव ब्रिगेडचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे अचानक हल्ला करून शत्रूच्या पुरवठा मार्गांवर किंवा तळांचा विनाश करणे होय. जनरल द्विवेदी यांनी सांगितले की, “सीमेवर शत्रूला करारा धक्का देण्यासाठी अत्यंत चालाख आणि घातक विशेष बल — ‘भैरव’ लाइट कमांडो बटालियन — स्थापन करण्यात आली आहे.”