पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आज आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. शुक्रवार, २५ जुलै २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग ४,०७८ दिवस भारताचे पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे. यासह, त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सर्वाधिक काळ सलग पंतप्रधानपदी राहण्याच्या विक्रमाला मागे टाकले आहे. ज्यामुळे ते आता भारताचे दुसरे सर्वाधिक काळ सलग पंतप्रधानपदी राहिलेले नेते बनले आहेत.(pm modi surpasses indira gandhi)
इंदिरा गांधी सलग 4077 दिवस पंतप्रधानपदी
पंतप्रधान मोदी यांनी या विक्रमासह इंदिरा गांधी यांचा सलग 4077 दिवसांचा विक्रम मोडला. इंदिरा गांधी यांनी जानेवारी 1966 ते मार्च 1977 या काळात सलग 4077 दिवस पंतप्रधानपद भूषवले होते.सध्या युनायटेड किंगडम आणि मालदीवच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला आहे, ज्यामुळे भारतीय राजकारणात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे.
नरेंद्र मोदींची कामगिरी
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी(PM Modi) हे भारतातील एकमेव नेते आहेत, ज्यांनी पक्षाचे नेते म्हणून सलग सहा निवडणुका जिंकल्या आहेत. यात २००२, २००७ आणि २०१२ च्या गुजरात विधानसभा निवडणुका, तसेच २०१४, २०१९ आणि २०२४ च्या राष्ट्रीय निवडणुकांचा समावेश आहे.