• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, September 12, 2025
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

कौडगाव टेक्निकल टेक्स्टाईल पार्क : १६.५४ कोटींच्या पायाभूत कामांचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ

Web Team by Web Team
June 5, 2025
in मुख्य बातम्या, धाराशिव
0
कौडगाव टेक्निकल टेक्स्टाईल पार्क : १६.५४ कोटींच्या पायाभूत कामांचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्यातील पहिल्या टेक्निकल टेक्स्टाईल पार्कच्या उभारणीसाठी कौडगाव येथे महत्त्वपूर्ण आशा पायाभूत कामांचा सोमवारी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. १६ कोटी ५४ लाख रुपये खर्चून कौडगाव एमआयडीसीत रस्ते व अन्य मूलभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत. या उपक्रमामुळे एक निर्णायक पाऊल पुढे पडले असून, धाराशिव जिल्ह्याच्या औद्योगिक व आर्थिक प्रगतीचे नवे पर्व सुरू झाल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

कौडगाव एमआयडीसीत ३०८ एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या टेक्निकल टेक्स्टाईल पार्कसाठी एमआयडीसीमार्फत एकूण ११४ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये रस्ते, पूल, पाणीपुरवठा, पाइपलाइन, वृक्षारोपण व विद्युतीकरण आदी सुविधा समाविष्ट आहेत. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १२.०७ कोटींचा रस्तेविकास व उर्वरित रक्कम इतर खर्चासाठी मंजूर करण्यात आले आहेत.

Related posts

Acharya Devvrat

सीपी राधाकृष्णन यांचा राजीनामा; गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार

September 11, 2025
Ramdara to Ekuraka

कृष्णा मराठवाडा,रामदारा ते एकुरका कामास मंजुरी; ७ हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली- आमदार राणाजगजितसिंह पाटील

September 11, 2025

धाराशिव जिल्ह्यात २०१९ मध्ये महाजनादेश यात्रेदरम्यान झालेल्या जनसभेला संबोधन करताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौडगाव येथे टेक्निकल टेक्स्टाईल पार्कची घोषणा केली होती. त्यानुसार ‘केपीएमजी’ या आंतरराष्ट्रीय सल्लागार संस्थेच्या माध्यमातून प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. मात्र, त्यानंतरच्या उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळात प्रकल्प रखडला.सत्तांतरानंतर महायुती सरकार सत्तेवर येताच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाली. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत याची अधिकृत घोषणा केली असून, एमआयडीसीच्या माध्यमातून प्रकल्प उभारला जाणार असल्याची ग्वाहीही दिली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात प्रस्तवावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘टेक्निकल टेक्सटाईल मिशन’ची घोषणा केली. या निर्णयामुळे कौडगाव येथील टेक्निकल टेक्सटाईल पार्कच्या कामाला अधिक गती मिळणार असून, औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.धाराशिव-बार्शी रस्त्याचे काम वेगात सुरू आहे. तसेच कौडगाव एमआयडीसी परिसरात ५० मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प कार्यान्वित झाला आहे, ज्यामुळे या भागात ऊर्जा सुरळीतपणे उपलब्ध होईल.रिलायन्सची गॅस पाईपलाईन या औद्योगिक परिसराजवळून जात असल्यामुळे या भागाला औद्योगिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे अनेक उद्योजक येथे गुंतवणुकीसाठी उत्सुक असून, या प्रकल्पांच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट लवकरच साध्य होईल, असा ठाम विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

जगप्रसिद्ध कंपन्यांसोबत राऊंड टेबल कॉन्फरन्स

धाराशिव जिल्ह्यातील कौडगाव एमआयडीसी येथे प्रस्तावित “टेक्निकल टेक्सटाईल पार्क” मध्ये देशी व आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने, एक विशेष राऊंड टेबल कॉन्फरन्स आयोजित करण्यात येत आहे. या परिषदेत तांत्रिक वस्त्रनिर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. तांत्रिक वस्त्रनिर्मितीत जगप्रसिद्ध असलेल्या असाही कासेई कॉर्पोरेशन (जपान),ड्यूपाँट डी नेमूर्स इंक. (अमेरिका),तेजिन लिमिटेड (जपान),एसआरएफ लिमिटेड (भारत),मिलिकेन अँड कंपनी (अमेरिका),फ्रॉइडेनबर्ग ग्रुप (जर्मनी),बेरी ग्लोबल ग्रुप (अमेरिका)किम्बर्ली-क्लार्क कॉर्पोरेशन (अमेरिका),आहलस्ट्रॉम-मुंक्षो (फिनलँड-स्वीडन),जॉन्स मॅनव्हिल (अमेरिका)या आघाडीच्या १० कंपन्यांशिवाय, २४ इतर नामांकित देशी व आंतरराष्ट्रीय कंपन्यांनाही कौडगाव MIDC येथील तांत्रिक वस्त्र पार्कमध्ये गुंतवणुकीसाठी सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.यात सहभागी कंपन्यांना कौडगाव MIDC येथे उभारण्यात येणाऱ्या टेक्निकल टेक्सटाईल पार्क अंतर्गत उपलब्ध भौगोलिक व औद्योगिक सुविधा यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे

Previous Post

“…तर मनसेच्या आंदोलनाला सरकार जबाबदार असेल”, राज ठाकरेंची सोशल मिडीया पोस्ट चर्चेत

Next Post

Bengluru Stampade : आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी, २ जणांचा मृत्यू झाल्याची भिती

Next Post
Bengluru Stampade : आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी, २ जणांचा मृत्यू झाल्याची भिती

Bengluru Stampade : आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी, २ जणांचा मृत्यू झाल्याची भिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Dharashiv ITI

Dharashiv ITI शासकीय आयटीआयसाठी ४० कोटींचा निधी, अद्ययावत संकुल बांधण्यात येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

2 months ago
दोन्ही ठाकरे एकत्र येणार..! हिंदी सक्तीविरोधात ५ जुलैला मुंबईत मोर्चा

दोन्ही ठाकरे एकत्र येणार..! हिंदी सक्तीविरोधात ५ जुलैला मुंबईत मोर्चा

3 months ago
Constable to PSI Department Exam

सेवेतील पोलीस शिपायांना पीएसआय होण्याची विभागीय परीक्षेद्वारे संधी

1 week ago
Tuljapur devi daarshan open

तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन, धर्मदर्शन दहा दिवस बंद

1 month ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज्यातील कामगार कायद्यांत सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हक्काचे उर्वरित १६ टीएमसी पाणी लवकरच मराठवाड्यात- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने ‘प्रसाद सेवे’चा २५ जुलैला शुभारंभ

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • सीपी राधाकृष्णन यांचा राजीनामा; गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार
  • कृष्णा मराठवाडा,रामदारा ते एकुरका कामास मंजुरी; ७ हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली- आमदार राणाजगजितसिंह पाटील
  • राज्यातील २९ महापालिकांना मिळणार आयएएस आयुक्त : ‘नगरविकास’ला मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Acharya Devvrat

सीपी राधाकृष्णन यांचा राजीनामा; गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार

September 11, 2025
Ramdara to Ekuraka

कृष्णा मराठवाडा,रामदारा ते एकुरका कामास मंजुरी; ७ हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली- आमदार राणाजगजितसिंह पाटील

September 11, 2025
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2025 तेरणा वृत्तांत.