तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीला गेल्याच्या बातम्या दिनांक 02 ऑगस्ट रोजी विविध माध्यमांमध्ये प्रसारित झाल्या आहेत. या बातम्या निरर्थक व चुकीच्या असून सदरची तलवार ही वाकोजीबुवा मठ येथे सुस्थितीत व सुरक्षीत असल्याची माहिती मंदिर प्रशासनाच्या वतीने पत्रकाद्वारे देण्यात आले आहे.(Shri Tuljabhavani Talwar)
तलवार दैनंदिन पुजेसाठी महंत तुकोजीबुवा गुरु बजाजीबुवा यांच्या ताब्यात
पत्रकात याबाबत अधिकची माहिती देताना मंदिर प्रशासनाने म्हटले आहे की, श्री तुळजाभवानी मंदिरातील विकासकामे जतन व संवर्धनाचे कामे चालू आहेत. श्री तुळजाभवानी जिर्णोद्धार प्रक्रिया निर्वघ्न पणे संपन्न व्हावी तसेच मंदीर वास्तुतील आत्मबल संवर्धित व्हावे यासाठी वाराणसी (काशी) स्थित पद्मश्री प. पू. श्री गणेश्वर द्रावीड शास्त्री व ब्रम्हवृंद, महंत, पुजारी वर्ग, सेवेकरी, कर्मचारी व अधिकारी यांच्या उपस्थितीत दिनांक 16 जून 2025 रोजी दुर्गासप्तशती संपुटीत अनुष्ठानाचे आयोजन करण्यात आले होते. याच दिवशी सदरचा विधी पूर्ण करण्यात आला आहे. सदर विधी दरम्यान वापरण्यात आलेली तलवार दैनंदिन पुजेच्या अनुषंगाने बाकोजीबुवा मठाचे मठाधिपती महंत तुकोजीबुवा गुरु बजाजीबुवा यांच्या ताब्यात दिलेली असून त्या तलवारीची नित्य पुजा वाकोजी बुवा मठ येथे महंत तुकोजीबुवा गुरु बजाजीबुवा यांच्यामार्फत करण्यात येत असल्यचे मंदिर प्रशासनाने पत्रकात म्हटले आहे.