देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल आरोग्याच्या कारणामुळे तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर देशाच्या राजकारणात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. एकीकाडे संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु असताना धनखड यांनी राजीनामा दिल्याने सभागृहाचे कामकाज कसे चालणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच नव्या उपराष्ट्रपतींची नियुक्ती करणे क्रमप्राप्त आहे. देशभरातील अनेक नावे चर्चेत असताना महाराष्ट्रातील बड्या नेत्याचे नाव या पदासाठी आघाडीवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.( Haribhau Bagade will Appointment of Vice President? )
या नेत्यांची नावे चर्चेत
उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्रातून हरिभाऊ बागडे या सिनियर नेत्याचे नाव चर्चेत आहे. याशिवाय तमिळनाडूचे राज्यपाल रवी किंवा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याही नावाचा या पदासाठी विचार होऊ शकतो, अशी देखील चर्चा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेले आणि अनेक वेळा लोकप्रतिनिधी, आमदार, मंत्री, आणि सध्या राजस्थानचे राज्यपाल म्हणून कार्यरत असलेले हरिभाऊ बागडे यांचे नाव उपराष्ट्रपती पदासाठी आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.